महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Viral Obscene Videos Of Girls : मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल माध्यमात वायरल करणाऱ्या आरोपीस अटक - मुलींचे फोटो आणि व्हिडिओ नकळत काढणे

रस्ताने जाणाऱ्या मुलींचे फोटो आणि व्हिडिओ नकळत काढून (Taking photos videos of girls without permission) ते एडिटिंग आणि मॉर्फ करून आपत्तीजनक स्थितीत सोशल माध्यमात व्हायरल करणाऱ्या (made and viral obscene videos of girls) तरुणास अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अमित विरपालसिंग भदौरिया (४३) असे अटक (youth arrested making girls obscene video, ) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य म्हणजे एका मुलीने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दिली होती. Latest news from Mumbai, Mumbai crime

Viral Obscene Videos Of Girls
आरोपीला अटक

By

Published : Nov 25, 2022, 2:04 PM IST

मुंबई :रस्त्यावरून चालणाऱ्या मुलींचे फोटो आणि व्हिडिओ नकळत काढून (Taking photos videos of girls without permission) ते एडिटिंग आणि मॉर्फ करून आपत्तीजनक स्थितीत सोशल माध्यमात व्हायरल करणाऱ्या (made and viral obscene videos of girls) तरुणास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमित विरपालसिंग भदौरिया (४३) असे अटक (youth arrested making girls obscene video, ) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तर सायबर विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून तपासात डझनभरहून अधिक मुलींचे फोटो परवानगी न घेता सोशल माध्यमातून व्हायरल केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सध्या आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात आहे. Latest news from Mumbai, Mumbai crime

मुलींचे अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या आरोपीस केलेल्या अटकेविषयी सांगताना पोेलीस


तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अटक -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 नोव्हेंबरला दुचाकीवरून एक मुलगी चालली असताना आरोपी अमित वीरपाल सिंग भदौरीयाने त्या मुलीचे नकळत आणि परवानगी न घेता फोटो आणि व्हिडिओ घेतले. या गोष्टीला त्या मुलीने देखील विरोध करून फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. मात्र आरोपीने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या तरुणीने या संबंधीची तक्रार मालाड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. हे प्रकरण मालाड पोलिसांच्या उत्तर विभाग सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आले. यानंतर त्वरित मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला मालाड परिसरातून ताब्यात घेतले.


मुलींच्या फोटोवर घाणेरडे कमेंट करून करायचा व्हायरल-पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी ३५४ (ड) ५०६ (६) सह आय टी कायदा ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहेत. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी रस्त्यावरून चालणाऱ्या महिला आणि मुलींचे अश्लील फोटो तयार करायचा. त्यावर घाणेरडे कमेंट टाकून ते फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल करत असे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details