मुंबई - कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता पाच स्तरांमध्ये या अनलॉकचे (maharashtra unlock) स्वरुप असणार आहे. सोमवारी 7 जूनपासून राज्यात हे आदेश लागू होणार आहेत. राज्यातील कोणत्या जिल्हा हा कोणत्या स्तरांत आहे? (maharashtra unlock guidelines) याबाबत ईटीव्ही भारतने दिलेला वृत्तांत.
हेही वाचा -पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल; वाचा, महाराष्ट्रातील अनलॉक कसा असणार?
- पहिल्या स्तरातील जिल्हे -ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
- दुसऱ्या स्तरातील जिल्हे -मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती, नंदुरबार
- तिसऱ्या स्तरातील जिल्हे -सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, अकोला, कोल्हापूर, पालघर, उस्मानाबाद
- चौथ्या स्तरातील 2 जिल्हे -पुणे, रायगड.