महाराष्ट्र

maharashtra

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला.. मुलूंडमधील तरुणांची चीनविरोधात निदर्शने

By

Published : Jun 18, 2020, 9:18 AM IST

भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत आपले 20 जवान हुतात्मा झाले आहे. आता चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. केंद्रात बसलेले सरकार जेव्हा सत्तेत नव्हते. तेव्हा स्वदेशी वस्तूंचे नारे देत होते, आता त्याचे काय झाले. आता आपण सर्व देशवासी एकत्र या वस्तूवर बहिष्कार घातला पाहिजे असे विजय ठक्कर यांनी सांगितले.

ban on china product
चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला.. मुलूंडमधील तरुणांचे चीनविरोधात निदर्शने

मुंबई - लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यांसोबत झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. त्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यातून चीनचा विरोध करण्यात येत आहे. आज मुलुंड परिसरात काही तरुणांनी एकत्र येत हातात बॅनर घेऊन चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. याचे पडसाद सध्या देशात देखील उमटताना दिसून येत आहेत. चीनच्या वाढत्या कुरापत्यांमुळे चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला.. मुलूंडमधील तरुणांचे चीनविरोधात निदर्शने

गलवान व्हॅलीमध्ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे आता नागरिकांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध नोंदवत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले आहे. मुलुंडच्या पाच रस्ता परिसरामध्ये काही तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल. चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन या तरुणांनी मूक निदर्शने केली.

आपले वीस जवान त्यांच्या हल्ल्यात शहिद झाले आहे. आता चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. केंद्रात बसलेले सरकार जेव्हा सत्तेत नव्हते. तेव्हा स्वदेशी वस्तूंचे नारे देत होते, आता त्याचे काय झाले. आता आपण सर्व देशवासी एकत्र या वस्तूवर बहिष्कार घातला पाहिजे, असे विजय ठक्कर यांनी सांगितले.आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करत आहोत की चिनी वस्तू वापरू नका. सोमवारी सीमेवरती आपले 20 जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याबरोबरच चिनी वस्तुंना आपल्या जीवनातून काढण्याची वेळ आली आहे असे अरविंद चिखले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details