मुंबई - येथील गजबजलेल्या मनीष मार्केटमधील एका दुकानात एका युवकाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान समोर आली. यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तर या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य