महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनी लाँडरिंग केस :​​​​​ अभिनेता सचिन जोशीसह 3 जणांच्या विरोधात ED ने दाखल केले आरोपपत्र - ED on Yes Bank fraud

येस बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओमकार रिअल्टर्सचे अध्यक्ष कमल किशोर गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा आणि अभिनेता आणि निर्माता सचिन जोशी यांच्यासह काही जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

Yes Bank fraud : ED files chargesheet against actor Joshi
मनी लॉन्ड्रिंग केस :​​​​​ अभिनेता सचिन जोशीसह तीन जणांच्या विरोधात ED ने दाखल केले आरोपपत्र

By

Published : Apr 4, 2021, 12:36 AM IST

Updated : Apr 4, 2021, 12:46 AM IST

मुंबई -येस बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओमकार रिअल्टर्सचे अध्यक्ष कमल किशोर गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा आणि अभिनेता आणि निर्माता सचिन जोशी यांच्यासह काही जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. सचिन जोशी हा वीकिंग ग्रुप व इतर कंपन्यांचा प्रमोटरही आहे.

मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. असा आरोप केला जातो की, बांधकाम क्षेत्राशी संबंधित ओंकार रियल्टर्स आणि डेव्हलपर्स यांनी येस बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेले 400 कोटी रूपये अवैधपणे विदेशात पाठवले आहेत. ईडीने यापूर्वी ओमकार ग्रुपच्या ठिकांवर छापे टाकले आहेत, याशिवाय या प्रकरणात तिन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये दाखल करण्यात आला होता पहिला एफआयआर

या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी प्रथम एफआयआर दाखल केला होता. कमल किशोर गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांनी मुंबईच्या वडाळा भागात असलेल्या आनंदनगर झोपड़पट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पाच्या नावावर घेतलेल्या 410 कोटी रुपयांच्या कर्जाचा वापर फसवणूक करुन दुसऱ्याच ठिकाणी केला. तर कर्जाच्या अटींनुसार या पैशांचा वापर संबंधित प्रकल्पांसाठी करायला हवा होता. त्यापैकी 80 कोटींपेक्षा जास्त रक्कम सर्व्हिस फीस आणि गुंतवणूकीच्या नावाखाली अभिनेता सचिन जोशी आणि त्यांची कंपनी वीकिंग ग्रुप ऑफ कंपन्यांना देण्यात आली.

सचिन जोशी यांना फेब्रुवारीमध्ये झाली होती अटक
जोशी किंवा त्यांच्या कंपन्यांनी असा व्यवसाय कधीच केला नव्हता, असेही तपासात उघड झाले आहे. फक्त पैशाची फेरफार करण्यासाठी त्याला पैसे दिले गेले. ईडीने सचिन जोशी यांना 18 फेब्रुवारी रोजी 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणात, गुप्ता आणि वर्मा यांना जानेवारीच्या उत्तरार्धात अटक करण्यात आली होती.

जोशींनी मल्ल्याचे किंग फिशर हाऊस खरेदी केले
सचिन जोशी यांनी 2017 मध्ये गोव्यातील विजय मल्ल्याचा 'किंगफिशर' बंगला देखील खरेदी केला होता. अभिनेत्री सनी लिओनीसमवेत 2013 मध्ये आलेल्या 'जॅकपॉट' चित्रपटासाठी सचिन जोशी चर्चेत आले. आक्षेपार्ह सीनमुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या एका गाण्यावर बंदी घातली होती.

यापूर्वीही वादात अडकला आहे सचिन जोशी
यापूर्वी अंधेरी (पश्चिम मुंबई) येथील रहिवासी असलेल्या पराग संघवी यांनी सचिन जोशीवर 58 लाखांची रॉयल्टी न भरल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याव्यतिरिक्त, 30 माजी कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याचा आरोपही त्यांच्या कंपनीवर करण्यात आला होता. या व्यतिरिक्त ऑक्टोबर 2020 मध्ये जोशीवर ड्रग्स प्रकरणात देखील खटला चालवण्यात आला होता.

Last Updated : Apr 4, 2021, 12:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details