मुंबईYear Ender 2023 : पश्चिम रेल्वे या विभागात चार 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेन (Vande Bharat Train) सुरू करण्यात आल्या आहेत. एकूण 206 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे रेल्वे मार्ग हे दुपारी पूर्ण झाले आहेत. 15 डब्यांच्या लोकल सेवामुळे गर्दी विभागली जाते. पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल ट्रेन 1383 होत्या. त्या 1394 पर्यंत गेल्या म्हणजे यावर्षी दहा अतिरिक्त लोकल ट्रेन वाढवल्या आहेत. यामध्ये 96 लोकल सेवा एसी लोकल पद्धतीने चालवल्या जातात. एकूण पैकी 199 या 15 डब्यांच्या लोकल सेवा चालवल्या जातात. ज्यामुळं पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होत आहे.
प्रवाशांच्या संख्येमध्ये यंदा वाढ : मध्य रेल्वेने यावर्षांमध्ये 103 कोटी प्रवाशांची ने-आण केलेली आहे. मागच्या वर्षीच्या 94 कोटी प्रवाशांच्या संख्येमध्ये यंदा त्यामध्ये वाढ झालेली आहे. तसेच मेल एक्सप्रेस गाड्यांचं सरासरी धावणाऱ्या रेल्वेची संख्या मध्य रेल्वे मार्गावर 371 इतकी झालेली आहे.
मध्य रेल्वेवर वंदे भारत ट्रेन : मध्य रेल्वेवर वंदे भारत ट्रेनच्या पाच जोड्या यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. त्यामधील प्रवाशांचा प्रवास तीन टक्के इतका झालेला आहे. तसेच एकूण 1,211 विशेष गाड्या तर सहा हजार तीनशे चार फेऱ्या यावर्षी चालवल्या गेल्या, त्यामध्ये देखील वाढ झालेली आहे.
फुकट्या प्रवाशांकन भरपूर महसूल गोळा : मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याकडून एकूण 213 कोटी रुपये दंड वसूल केला गेला आहे. मालवाहतुकीमध्ये महसूल 5964 कोटी रुपये इतका प्राप्त झालेला आहे.
मेक इन इंडियाची यशस्वी अंमलबजावणी: मध्य रेल्वेने मेक इन इंडियाच्या धोरणानुसार नागपुरामध्ये देखभाल डेपोचं काम सुरू केलं आहे. या ठिकाणी हाय स्पीड मालवाहू इंजिन इतर इंजिन असे सर्व वापरले गेले आहेत. सध्या एकूण त्या ठिकाणी 126 इंजिनची देखरेख नियमित पद्धतीने होते. मध्य रेल्वे ट्रॅक नूतनीकरणाच्यासाठी 252 किलोमीटर पर्यंतचे ट्रॅक नूतनीकरण केले आहे.
'मेरी सहली' योजनेचा लाभ :रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी माहिती दिली की, प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी मध्य रेल्वेने एकूण 512 महिला डब्याना इमर्जन्सी टॉप बॅक सिस्टीम बसवली आहे. एकूण 421 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांमधील एकट्या महिला प्रवाशांना 'मेरी सहली' योजनेचा लाभ देखील होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील स्वयंचलित जिने : पश्चिम रेल्वेवर एकूण 20 एस्केलेटर 32 लिफ्ट यावर्षी सुरू केले गेले आहेत, तर 45 आरओबी आणि 73 आरयुबी आणि एकूण 28 फूटवर ब्रिज यावर्षी एकूण सुरू केले आहेत.
एक देश एक उत्पादन मोहिमेत पुढाकार : एक देश एक उत्पादन या मोहिमेत अंतर्गत पश्चिम रेल्वेच्या एकूण 97 रेल्वे स्थानकामध्ये एक स्टेशन एक उत्पादन या संदर्भातील स्टॉल सुरू केले आहेत.
पश्चिम रेल्वे सहाव्या रेल्वे मार्गाचा विकास: पश्चिम रेल्वेवर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांद्रा जवळील खार रेल्वे स्थानक पासून ते विरारच्या दिशेला गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीचा सहावा रेल्वे मार्ग पूर्णपणे विकसित केलेला आहे. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत पश्चिम रेल्वेवर ६४ कोटी अकरा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झालेला आहे.
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया : पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली की, वंदे भारत ट्रेन यंदा विशेष लक्ष देऊन सुरू करण्यात आलेली आहे. खार ते गोरेगाव येथे सहाव्या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण आणि रुंदीकरण देखील झाले. त्यामुळं पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस सेवा यांना आता अडथळे दूर झाले आहेत. त्याशिवाय संरचनात्मक मूलभूत अनेक विकासात्मक योजना पार पडलेल्या आहेत.
हेही वाचा -
- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांसाठी चालवणार आठ विशेष 'लोकल रेल्वे'
- मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त घराबाहेर पडताय; कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
- Western Railway News : प्रवाशांना दिवाळी भेट! सोमवारपासून एसी लोकलच्या 17 फेऱ्यांत वाढ