मुंबई : 2022 मध्ये राज्यात अनेक मोठ्या गुंतवणूकी झाल्या. विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. काही प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्या सर्वांविषयी माहिती जाणून ( year ender 2022 ) घेऊयात. Look Back 2022
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 : महाराष्ट्रातील 3 शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यातील तीन शिक्षकांना यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यात गौरी सुहास नामजोशी, पुणे विद्यार्थी गृहाच्या शिशु निकेतन, सदाशिव पेठच्या माजी प्राचार्या आहेत. दुसऱया लता रामदास घोलप, प्रा नाथ हरी पुरंदरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिवाजीनगर आहेत. तर तिसऱ्या इनामदार आयुब फत्तेखान, संत ज्ञानेश्वर विद्यालय चास, आंबेगावचे मुख्याध्यापक ( National Teacher Award 2022 ) आहेत.
पद्म पुरस्कार 2022 प्राप्तकर्त्यांची यादी :पद्मविभूषण कु. प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात ( National Award 2022 ) आला. कु. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय पद्मभूषण हा श्री नटराजन चंद्रशेखरन यांना आणि सायरस पूनावाला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रांत मोलाकाची कामगिरी केल्यामुळे प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार हा हिम्मतराव बावस्कर यांना वैद्यकिय क्षेत्रात, सुलोचना चव्हाण यांना कला, विजयकुमार विनायक डोंगरे यांना वैद्यकिय, श्री सोनू निगम यांना कला, अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पुरस्कार मिळाला. भीमसेन सिंघल यांना वैद्यकिय क्षेत्रात, बालाजी तांबे यांना वैद्यकिय क्षेत्रात मरणोत्तर पुरस्कार मिळाला.
दावोसमध्ये 30, 379 कोटींची गुंतवणूक :परदेशी कंपन्यांनी राज्यामध्ये मोठी गुंतवणूक केली ( Foreign Investment In Maharashtra ) आहे. यामुळे सुमारे ६६ हजार नवे रोजगार निर्माण झाले आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ( Davos World Economic Forum ) ही गुंतवणूक करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आदीत्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व केले होते. त्यांच्याशिवाय आशिष कुमार सिंग, बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते. या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश असल्याचेही सुभाष देसाई म्हणाले होते.
निर्यात : फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यातून एकूण 65.96 अब्ज यूएसडी डॉलरच्या मौल्यवाण वस्तूंची निर्यात झाली. महाराष्ट्राने मोती, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान खडे, सोने आणि इतर मौल्यवान धातूंचे दागिने, लोखंड आणि पोलाद आणि ड्रग फॉर्म्युलेशन या प्रमुख वस्तूंची निर्यात केली. ही सर्वात मोठी निर्यात ( year ender 2022 export ) आहे.
गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार : भारतीय खाण क्षेत्रातील दिग्गज वेदांता आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक फॉक्सकॉन यांनी राज्यात त्यांचा नवीन सेमीकंडक्टर चिप प्लांट उभारण्याच्या करारातून माघार घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला. त्यातील वेदांता गुजरातला गेला. त्याऐवजी एक करार करण्यात आला. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे ( MoU with Gujarat Govt ) सांगितले .
लीड्स रँकिंग 2022 :लीड्स रँकिंग 2022 मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. 'पायाभूत सुविधांच्या गुणवत्ते'शी संबंधित निर्देशकांमध्ये सरासरीपेक्षा जास्त गुण आहेत. 13 ऑक्टोबर 2022 रोजी लॉजिस्टिक्स इझ अॅक्रॉस डिफरंट स्टेट्स (LEADS) रँकिंगमध्ये राज्याच्या "अचिव्हर्स" मध्ये पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीचे समर्थन करण्यात आले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 22 वर्षाच्या चौथ्या लीड्स अहवालाचे अनावरण केले.