मुंबई :महाराष्ट्रात 4 ऑगस्ट रोजी सुमारे 1,400 कोटी रुपयांचे 703 किलो एमडी ड्रग जप्त केले. 16 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये 1,026 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. 1 ऑक्टोबर रोजी डीआरआयने आयात केलेल्या संत्र्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेली 1,476 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. तसेच नागपूर येथे देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा (Narcotics) साठा जप्त करण्यात आला होता. अश्या प्रकारे महाराष्ट्रात (Look Back 2022) वर्षे 2022 मध्ये (Year Ender 2022) मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्ती (drug seize) कारवाई करण्यात आल्या. जाणुन घेऊया, केव्हा, कुठे आणि कधी कोणकोणत्या ड्रग्ज विरोधी कारवाई करण्यात (major drug bust in Maharashtra) आल्या ते.
4 ऑगस्ट 2022 : 4 ऑगस्ट 2022 रोजी, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात 1400 कोटी किमतीचे 703 किलो एमडी ड्रग्ज होते.
16 ऑगस्ट 2022 :मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये छापेमारी करताना ₹ 1,026 कोटी किमतीचे मेफेड्रोन जप्त केले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने गुजरातमधील अंकलेश्वर येथील मेफेड्रोन उत्पादन युनिटवर छापा टाकून 513 किलो प्रतिबंधित पदार्थ जप्त केला. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ₹ 1,026 कोटी आहे, असे पोलिसांनी सांगितले.
1 ऑक्टोबर 2022 : डीआरआयने आयात केलेल्या संत्र्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेली 1,476 कोटी रुपयांची औषधे जप्त केली. देशातील सर्वात मोठ्या ड्रग्ज जप्तींपैकी एक, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई युनिटने एकूण 1,476 कोटी रुपयांचे 198 किलो क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि 9 किलो उच्च-शुद्धता कोकेन जप्त केले आहे. हे ड्रग्ज फळांच्या खेपेत लपवण्यात आली होती, असे एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
1 सप्टेंबर 2022 : मुंबईच्या खोपोली परिसरात 1 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 210 किलोग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला. या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी रुपये इतकी किंमत आहे. एका वाहनासह एका आरोपीला ताब्यातही घेण्यात आले होते. एनसीबीने एपी ओडिशा भागातून मुंबईला आणलेल्या मोठ्या मालाची डिलिव्हरी जप्त करून, कारवाईचे काम केले होते.
2 ऑक्टोबर 2022 : एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर एनसीबीने क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक केली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
8 ऑक्टोबर 2022 :मुंबई येथे ५०.२३ किलो कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा जप्त करण्यात आल्या होत्या. यांची किंमत ५०२ कोटी रुपये एवढी होती. दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या पेअर आणि हिरवी सफरचंदे घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई DRI विभागीय युनिटने हा माल जप्त केला होता. एनडीपीएस कायद्यानुसार आयातदाराला अटक करण्यात आली आहे.