मुंबई :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre State Level Award), मुंबई येथे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना शरद पवारयांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात (Award given to Literary Madhu Mangesh Karnik) आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण हे राजकारणी सोबतच उत्तम वाचक आणि साहित्यिक (Award given by Sharad Pawar) होते.
Yashwantrao Chavan Centre State Level Award : यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय पारितोषिक साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना प्रदान
मुंबई येथे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना शरद पवार यांच्या हस्ते (Award given by Sharad Pawar) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात (Award given to Literary Madhu Mangesh Karnik) आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे देखील उपस्थित (Yashwantrao Chavan Centre State Level Award) होते.
साहित्याची आवड :यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांच्या खात्यात फक्त 27 हजार रुपये होते. मात्र 24 हजार पुस्तक होती. एवढी त्यांना साहित्याची आवड असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे ज्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांचा आवड होती. त्याच क्षेत्रात आज मधु कर्णिक यांची निवड केली. मला आनंद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोकणात साहित्याचे काम अखंड सुरु ठेवावे, यासाठी मधू मंगेश कर्णिक यांनी काम केले आहे. त्यांनी बारामतीत त्यांची मुलगी दिली. त्यामुळे त्यांना बारामतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की, इकडचे व्याही किती चमत्कारीक आहेत, असे म्हणत पवार (Sharad Pawar) यांनी मिश्किल टिप्पणी केली.
शरद पवार यांचे योगदान :यशवंतराव चव्हाण मोठे साहित्यिक होते. महाराष्ट्राला मोठे होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आणीबाणीचा काळ आम्ही पाहिला होता. त्यावेळचे स्वगत पुस्तके यशवंत चव्हाण त्यांनी आपल्याला दिल होते. अशा मोठया साहित्यकाच्या नावाने मिळणारा पुरस्कार मिळतो आहे. याचा खूप आनंद होतो आहे. मागील 60 वर्षांपासून आपली आणि शरद पवार यांची ओळख आहे. आपण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या शिदोरी मासिकात लिहीत होतो. तेव्हा पासून शरद पवार आणि आमची मैत्री होती जी अजुनही टिकून आहे. सीमा प्रश्नाचे सध्या वावडे उठले आहेत. 60 वर्षापुर्वी महाराष्ट्राने सगळे केले होते. निवडणूका झाल्या होत्या. माञ सीमा भागाचा प्रश्न होता. त्यावेळी इंग्रजीत एक डॉक्युमेंटरी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे निर्माते शरद पवार होते आणि आपण लेखक होतो. ती आता सुप्रीम कोर्टात लवकरच सीमा प्रश्नी सुनावणी पार पडणार आहे. त्यावेळी पुरावा म्हणुन ही डॉक्युमेंट्री वापरण्यात येईल, असे यावेळी मधू मंगेश कर्णिक (Literary Madhu Mangesh Karnik) म्हणाले.