मुंबई - माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यशवंत सिन्हा यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून उद्यापासून (गुरुवार) 'गांधी शांती यात्रा' काढण्यात येत आहे. त्यासंदर्भात यशवंत सिन्हा यांनी शरद पवारांशी आज चर्चा केली.
यशवंत सिन्हांनी घेतली शरद पवारांची भेट, उद्यापासून 'गांधी शांती यात्रे'ला प्रारंभ - मुंबईतून 'गांधी शांती यात्रे'ला प्रारंभ
माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यशवंत सिन्हा यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून उद्यापासून (गुरुवार) 'गांधी शांती यात्रा' काढण्यात येत आहे. त्यासंदर्भात यशवंत सिन्हा यांनी शरद पवारांशी आज चर्चा केली.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून गुरूवार, दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता ‘गांधी शक्ती यात्रेचा’ प्रारंभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. CAA आणि NRC हे कायदे जबदस्तीने अंमलात आणून केंद्र सरकारने देशात विभाजनवादी धोरण अवलंबल्याचा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला होता. या कायद्यांना विरोध म्हणून ही गांधी शांती यात्रा काढण्यात येत आहे.
या यात्रेचा प्रारंभ उद्या मुंबईतून होत आहे. ९ जानेवारी ते ३० जानेवारी महात्मा गांधीच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिल्ली (राजघाट) येथे या यात्रेचा समारोप होईल.
TAGGED:
Yashwant sinha meet sharad pawar