महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीत उल्लेख - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

शिवसेना नेते तथा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने चार दिवस छापेमारी (Income tax department raid) केली.यात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र जप्त केले होते. यात एक महत्त्वपूर्ण डायरी हाती लागली ( diary confiscated by the income tax) होती. ज्यात 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख रुपये दिल्याची (Yashwant Jadhav gave 2 crore 60 lakhs to 'Matoshri'?) नोंद आहे.

Yashwant Jadhav
यशवंत जाधव

By

Published : Mar 27, 2022, 12:29 PM IST

Updated : Mar 27, 2022, 4:58 PM IST

मुंबई:यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये प्रमुख्याने 'मातोश्री' नावाने दोन कोटी साठ लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. यामध्ये 60 लाखांची घड्याळ तर 2 कोटी गिफ्ट म्हणून दिले असल्याचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र यशवंत जाधव यांनी आयकर विभागाला जबाब नोंदवताना म्हटले आहे की 'मातोश्री' म्हणजे आई आहे. आईच्या वाढदिवसाला हे गिफ्ट देण्यात आले होते.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जाधव यांचे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित 35 हूनअधिक ठिकाणी केलेल्या छापेमारीत 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता सापडली आहे.यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत 36 मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव 'मातोश्री' आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का याचा तपास केला जात आहे. मात्र जाधव यांनी सदरचे दावे फेटाळले आहेत. आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने 2 कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या असा दावा जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.

यशवंत जाधव यांच्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्तीमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे 130 कोटींपेक्षा अधिक 36 स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. त्यात त्यांच्या किंवा त्यांच्या सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत या मालमत्ता घेतल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात खरेदी केलेल्या 27 मालमत्तांचा समावेश आहे.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेडच्या माध्यमातून कथितपणे भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅटची खेरदी केले आहेत. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. शिवाय आयकरने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरू केला आहे. त्या मालमत्ताही जाधव यांच्या असल्याचा संशय आहे. जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यातील इम्पिरियल क्राउन या हॉटलेची खरेदी केले होते.

ते हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडियाने किरायाने घेतले होते. नंतर न्यूजहॉकला मुंबई महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. या हॉटेलची खरेदी 1.75 कोटीला झाली होती. मात्र विक्री तब्बल 20 कोटीं पेक्षा जास्त किमतीला झाली. या व्यवहारातील प्रधान डिलर्स प्रायवेट लिमिटेडची भूमिकाही चौकशीच्या फेऱ्यात आहे. आयकर विभागाने जाधव यांच्याकडून स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच्या काळात घेतलेल्या कंत्राटांची माहिती मागवलीय. शिवाय कंत्राटदारांची माहिती आणि त्यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या पैशाची सविस्तर माहिती मागवल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : Mumbai Traffic Jam : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी इस्टर्न फ्री वे, कोस्टल रोडला जोडणार.. पूर्व- पश्चिम उपनगरातील नागरिकांना फायदा

Last Updated : Mar 27, 2022, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details