मुंबई -भाजपला फोडाफोडीचे राजकारण करण्याची सवय झाली आहे. सत्ता असल्याने ते उतमात करतात. राजस्थानमध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते सरकार अडचणीत आणण्यासाठी सगळ्या एजन्सी वापरतात. ही आपल्या देशाची संस्कृती नाही, अशी टीका महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या संदर्भात ठाकूर बोलत होत्या.
'सत्तेसाठी भाजप उतमात करतेय, ही देशाची संस्कृती नाही' - यशोमती ठाकूर न्यूज
मी कर्नाटकमध्ये होते. त्यावेळी भाजपाचे राजकारण मी सर्व जवळून पाहिले. त्यांनी मध्यप्रदेशमध्येही तेच केले. आपल्या देशाची ही संस्कृती नाही. पण भाजपचे लोक असे वागत आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना काँग्रेसने सर्व काही दिले. आमचे सर्वांचे म्हणणे पक्ष ऐकत असतो. मग पायलट तर मोठे नेते आहेत. त्यांचे पक्ष काही ऐकत नाही, असे होऊच शकत नाही. त्यांनी समोर येऊन बोलायला हवे, असेही ठाकूर म्हणाल्या.

राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या मनाचे आहेत. महाराष्ट्रात आमच्या मागे सोनिया गांधी आहेत, शरद पवारसारखे व्यापक मंडळी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार स्थिर असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडून आमचे सरकार टिकणार नाही, असा दावा वारंवार केला जातो. मात्र, सत्तेत दुसऱ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, हे त्यांना सहन होत नाही, अशी टीका ठाकूर यांनी केली.