महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा - मुंबई कोरोना बातम्या

रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने मुलुंड कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्याच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

xygen shortage at   mulund covid Center in mumbai
मुंबई : मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

By

Published : Apr 17, 2021, 9:03 PM IST

मुंबई - राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनच मिळत नसल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये तर एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उरला आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पळवला जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जातो. रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने मुलुंड कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्याच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंखेमुळे रोज 150 ते 175 रुग्ण मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. तर तिथेच डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णाची संख्या केवळ 100 आहे. त्यामुळे कोविड सेंटरवर येणारा ताण वाढत चालला आहे.

प्रतिक्रिया

एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा -

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मुलुंड कोविड सेंटरमध्ये सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असला तरी, केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा असल्याची धक्कादायक माहिती कोविड सेंटरचे मुख्य डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी केली असून सध्या तरी ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. ऑक्सिजन नसल्या कारणाने कुर्ल्यातील भाभा कोविड सेंटर, शताब्दी हॉस्पिटल आणि एम.टी. अग्रवाल हॉस्पिटलमधून रुग्णनां तातडीने मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्यामुळे मुलुंडच्या कोविड सेंटरवर अधिकचा ताण आला आल्याची माहिती प्रदीप आंग्रे यांनी दिली. सध्या मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 1250 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 450 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आल्याने ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. एकदिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा कोविड सेंटरमध्ये असल्याने ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ऑक्सिजन मिळालेला नसल्याने पुढे परिस्थिती गंभीर होणार असल्याची भीती प्रदीप आंग्रे यांनी व्यक्त केली आहे.

रुग्णाचा ऑक्सिजन सिलेंडर काढण्यात आला -

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक सेंटर किंवा रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. कोरोनाची लागण झाल्याने एक महिलेला कुर्ल्याच्या भाभा कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना भाभा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, काल भाभा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने त्यांना मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये तत्काळ हलवण्यात आले. आज सकाळपासून त्या महिलेवर मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू झाले. या कोविड सेंटरमधून त्यांना ऑक्सिजनची उपलब्धतादेखील करून देण्यात आली. मात्र, रुग्ण शौचासाठी गेला असता त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर अचानक काढण्यात आला, अशी धक्कादायक माहिती त्या महिलेच्या पतीने दिली.

हेही वाचा - सत्ताधाऱ्यांना पराभव दिसत आहे; मुन्ना महाडिकांच्या टीकेला बंटी पाटलांचे प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details