मुंबई :मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला यावेळी राज्यपालांनी पुष्पहार अर्पण केला. बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन पालिकेच्या स्मारक समितीकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याच्या नवे राज्यपाल रमेश बैस यांनी कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासह क्रेनच्या मदतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सर्वणकर हे देखील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते.
6 नेत्यांची कार्यक्रमाला दांडी :प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत दादरच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे आमदार राजहंस सिंह इत्यादी लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्यास असल्याची माहिती देण्यात आली होती. इथे प्रत्यक्षात मात्र राज्यपाल आणि आमदार सदा सर्वांकर हेच दोन व्यक्ती उपस्थित होते, बाकी सर्वांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे.