मुंबईCharas Smuggling:मुंबई अमली पदार्थ कक्षाच्या वरळी युनिटने आठ किलो चरससह एका व्यक्तीला अटक (Charas Smuggling) केली आहे. जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत २.४० कोटी रुपये आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटचे प्रभारी निरीक्षक संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम यांच्यासह पथक शनिवारी गस्त घालत होते. जेव्हा गस्त पथक मस्जिद बंदरच्या मुथुमरियम मंदिराजवळ पोहोचले तेव्हा फूटपाथवर एक व्यक्ती उभा होता, तो व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
आठ किलो चरस जप्त : सदर व्यक्ती संशयास्पद असल्याने, अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळीच्या टीमने जाऊन त्याची चौकशी केली. तसेच त्या व्यक्तीने दिलेल्या उत्तराने संशय आणखी बळावला. पोलिसांनी या व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून आठ किलो चरस जप्त करण्यात आले.
चार दिवसांची सुनावली पोलीस कोठडी : अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हुसैन अब्दुल्ला शिरगावकर (48) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो ठाकूरपाडा, मुंब्रा येथील रहिवासी आहे. शिरगावकर यांनी ही चरस डिलेव्हरीसाठी कोणाकडे आणला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. अमली पदार्थ विरोधी कक्षाने शिरगावकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
एकूण 40 कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त : एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शिरगावकर याच्याकडे निळ्या रंगाची पिशवी सापडली. त्यात त्याने ड्रग्ज लपवले होते. पोलिस लवकरच त्याच्या घराची झडती घेणार आहेत. गुरुवारीही मुंबई एएनसीने एकूण पाच जणांना अटक केली आणि 88 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. अमली पदार्थ विरोधी कक्षाने यावर्षी एकूण 93 गुन्हे नोंदवले आहेत. तर 194 ड्रग्ज तस्करांना अटक करून 40 कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा -
- Mumbai Crime News: मुंबई शहर अमली पदार्थ तस्करांच्या विळख्यात?; दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 2 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त
- Mumbai Crime News : धक्कादायक! 6 कोटीचे अमली पदार्थ आणले सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून; युगांडाच्या दोन महिलांना अटक
- Nashik Drug Case : एमडी ड्रग्जनंतर युवा पिढीला 'या' व्यसनाचा विळखा? जाणून घ्या धोके