महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगभ्रमंती केलेला भारताचा वास्को-द-गामा 'विष्णूदास चापके' - traveler

विष्णूदास चापकेचा जगसफरीचा अनुभव अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे. हा प्रवास त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये उलगडला आहे.

विष्णूदास चापकेचे अभिनंदन करताना ईटीव्ही भारत टीम

By

Published : Mar 27, 2019, 11:59 PM IST

मुंबई- तीन वर्ष कोणत्याही नियोजनाशिवाय जगभ्रमंती करुन भारतात परतलेल्या विष्णुदास चापके यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. पेशाने पत्रकार असलेल्या विष्णुदासने जगभ्रमंती करण्याचा निश्चय केला आणि तो नेटाने पुर्णही केला. या जगसफरीचा अनुभव अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे. हा प्रवास त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये उलगडला आहे.

विष्णूदास चापके यांची मुलाखत


विष्णुदास चापके याने ३ वर्षात ३५ देश आणि ४ खंड पादाक्रांत केले आहेत. २१ मार्चला तो या सफरीवरुन ठाण्यात परतला आहे. या जगाच्या सफरीमुळे तो जगविख्यात भारतीय वास्को-द-गामा झाला आहे, असेच म्हणावे लागेल. कोणतेही नियोजन न करता, जसा मिळेल तसा प्रवास करुन, अनोळखी लोकांकडून मदत मागत, त्यांच्या घरी राहून, प्रसंगी रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहून त्यांने प्रवास केला.


प्रवासासाठी त्याने मुंबईतील घरासाठी जमवलेले सर्व पैसे खर्च केले. वडिलांनी गावची जमीन विकायला काढली. तर मित्रांनीही पैसे जमवून त्याला मदत केली. शेवटी टाटा ट्रस्टने त्याच्या उर्वरित सर्व प्रवासाचा खर्च उचलला. त्यामुळेच तो जगभ्रमंती करुन पुन्हा भारतात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details