मुंबई : गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा गोवरच्या (Measles Patients) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच सध्या गोवर झालेल्या मुलांना त्वरित निमोनिया होत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या गोवरच्या केसेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गोवरचा विशिष्ट विषाणू आहे का? असा प्रश्न पालिकेच्या आरोग्य विभागाने उपस्थित केला आहे. तर गोवरचा विशिष्ट विषाणू नसल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organizations) डॉ. मीता (Dr Mita) यांनी (guidance on Measles and Rubella and Immunization)केला.
Guidance On Measles : गोवरनंतर लहान बालकांना लवकर होतोय न्यूमोनिया, गोवरचा वेगळा विषाणू नाही - डॉ. मीता - जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ मीता
मुंबईमध्ये कुटुंब आणि आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, युनीसेफ आणि नॅशनल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोवर (Measles) , रुबेला (Rubella) आणि लसीकरण (Immunization) यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organizations) डॉ. मीता (Dr Mita) यांनी मार्गदर्शन (guidance on Measles and Rubella and Immunization) केले.
गोवरचा वेगळा विषाणू आहे का? :मुंबईमध्ये कुटुंब आणि आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, युनीसेफ आणि नॅशनल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिसेल, रुबेला आणि लसीकरण यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. मीता बोलत होत्या. यावेळी बोलताना, गोवर हा आजार याआधीही होता. मात्र सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या वाढली आहे. गोवरबाधित बालकांना दोन आठवड्यानंतर न्यूमोनियाची लागण व्हायची. मुंबईत मात्र चार दिवसांतच न्यूमोनियाची लागण होत असल्याने, हा गोवरचा वेगळा विषाणू आहे का? असा प्रश्न पालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. अरुणकुमार गायकवाड यांनी उपस्थित केला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेक्षण अधिकारी डॉ मिता यांनी नव्या विषाणूच्या अंदाजाचे खंडन केले.
सिरो सर्व्हेक्षण करायचा विचार :मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असताना कोणत्या विषाणूचा प्रसार आहे?, किती प्रमाणात हा प्रसार आहे? नागरिकांमध्ये शरीरात किती रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली?, याची माहिती मिळण्यासाठी सिरो सर्व्हे केला जात होता. सध्या गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने गोवरच्या रुग्णांबाबतही सिरो सर्व्हेक्षण करायचा विचार सुरु आहे. मात्र याबाबतीत अंतिम निर्णय घेणे बाकी असल्याचे, डॉ. मिता यांनी स्पष्ट केले.