महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात - विधानसभा कामकाज सल्लागार समिती

विधानसभा अध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. याबाबतचा ठराव पटलावर ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानभवनात ही बैठक सुरू आहे.

mantralaya
मंत्रालय

By

Published : Jun 22, 2021, 1:01 PM IST

मुंबई - राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेचा धोका, म्यूकरमायकोसिस, डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे अधिवेशनाचा कालावधी किती दिवसांचा असावा, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. याबाबतचा ठराव पटलावर ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानभवनात ही बैठक सुरू आहे.

बैठकीला कोण उपस्थित?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक- निंबाळकर, विधानपरिषदच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, आदी या बैठकीला उपस्थित आहेत.

हेही वाचा -महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक, महत्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details