मुंबई- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची घोषणी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असून सर्व उद्योगधंदे बंद आहेत. पायाभूत सुविधा, प्रकल्प, बांधकाम प्रकल्पही बंद आहेत. अपवाद कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 चे काम सुरू आहे. कोरोनाचे सावट असतानाही मेट्रो 3 चे काम सुरू आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिली आहे.
Coronavirus : भारत 'लॉकडाऊन' मात्र मेट्रो-3चे काम सुरूच - कोरोना विषाणू
मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पहिला भुयारी मार्ग उभारला जात आहे. हा मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. त्यामुळेच अगदी देश लॉकडाऊन असतानाही मेट्रो 3ची कामे बऱ्यापैकी सुरू आहेत.
मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पहिला भुयारी मार्ग उभारला जात आहे. हा मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. त्यामुळेच अगदी देश लॉकडाऊन असतानाही मेट्रो 3 ची कामे बऱ्यापैकी सुरू आहेत. एमएमआरसीच्या माहितीनुसार इमारती व मैदानांची यंत्राद्वारे देखरेख करणे, टीबीएमचे (TBM) कार्यान्वयन संथ गतीने करणे, अशी अनिर्वाय कामे सुरू आहेत. ही कामे बंद करता येत नसल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे.
त्याचवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व सूचनांची व मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कॉर्पोरेशनद्वारे काटेकोरपणे केली जात असल्याचा दावा ही एमएमआरसीने केला आहे. तर राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ही कामे सुरू राहतील. अत्यावश्यक आणि अपरिहार्य कामे करणारे कर्मचारी व अभियंते कोरोना संबंधित सर्व नियम तसेच सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी मेट्रो 3 च्या कामावर आक्षेप घेतला जात आहे. काम करणारे माणसं नाहीत का? त्यांना कॊरोनाचा धोका नाही का? सरकार याकडे कानाडोळा का करत आहे? असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे.
हेही वाचा -मुंबई पोलिसांची धडक कारवाई; अवैधरित्या साठा केलेले एक कोटींचे मास्क जप्त