मुंबई -देशातील सर्वात लांब दुहेरी बोगद्याचे काम पुढील वर्षी मार्च 2022 मध्ये सुरू होणार आहे. 11.80 किमीचा हा बोगदा ठाणे ते बोरिवली दरम्यान असणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे.
66 महिन्यांत काम पूर्ण होणं अपेक्षित -
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा प्रकल्प हाती घेतला आहे. 10.25 किमीचे खोदकाम सुरू होणार आहे. तर 1.55 किमीचे स्टेशन असणार आहे. यासाठी जवळपास 11 हजार 235 कोटींचा खर्च असणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झाला असून जमिनीच्या भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम 66 महिन्यात होणे अपेक्षित आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
या बोगद्यात दोन्ही बाजूने 3-3 अशा सहा लेन असणार आहेत. सध्या एका तासात हा प्रवास करावा लागतो. याबोगद्याद्वारे हे अंतर केवळ 15 मिनिटांपर्यंत येणार आहे. बोरीवली ते ठाण्यातील पश्चिम एक्सप्रेस महामार्गाला हा बोगदा जोडणार आहे. या प्रकल्पात दर 300 मीटर अंतरावर, ड्रेनेज सिस्टीम, धूर शोधक आणि हवा स्वच्छ व ताजी ठेवण्यासाठी जेट फॅनची व्यवस्था करण्यात येईल. माध्यमातून इंधनाची दहा लाख टनांहून जास्त बचत होईल आणि उत्सर्जन 36 टक्क्यांनी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; रस्ते रेल्वे वाहतूक प्रभावित