मुंबई - आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नसल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार' ही कार्यपद्धत योग्य नाही - नवाब मलिक - Nawab Malik latest news
निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक
निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे.