मुंबई -हैदराबाद एन्काऊंटरचे सर्वत्र समर्थन केले जात असले तरी, कायद्याच्या चौकटीत न्याय मिळणे अपेक्षित आहे. एन्काऊंटरच्या समर्थनात महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असलेल्या उणीवा झाकल्या जाऊ नयेत, असे परखड मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - नाशिक : हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी विद्यार्थीनींच्या संमिश्र प्रतिक्रिया
महिलांवर अत्याचार झाल्यानंतर दोषींचे एन्काऊंटर करणे हा पर्याय होऊ शकत नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
पुणे - हैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर योग्य असल्याचा अनेक जणांचे मत आहे. मात्र, एन्काऊंटर केले म्हणजे पीडितेला न्याय मिळाला असे होत नाही. अशा घटना परत-परत घडू नये, पुन्हा कुठल्या निर्भयावर अशी वेळ येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण व्हावी, अशी माझी न्यायाची व्याख्या आहे. असे सांगत बऱ्याच वेळा एन्काऊंटरमध्ये निष्पाप बळी गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आता या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळालेली आहे. मात्र, एन्काऊंटरच्या नावाने दिवाळी साजरी करण्याची आवश्यकता नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हैदराबादमधील डॉक्टर महिलेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाती आरोपींच्या एन्काऊंटरबाबत बोलताना नीलम गोऱ्हे हेही वाचा -हैदराबाद एन्काऊंटर: पोलिसांनी कायदा हातात घेणे हे न्यायव्यवस्थेचे अपयश - असीम सरोदे
हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चार मुख्य आरोपींचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर समाजातील विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.