मुंबई : सांताक्रूझ येथील वाकोला परिसरातील गावदेवी येथील इमारतीत घरमालक महिलेला आणत असे. त्यानंतर संबंधित महिला व्हरांड्याच्या नग्नावस्थेत फिरत होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वाकोला पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप मोरे यांनी ईटीव्ही इंडियाला सांगितले की, १४ फेब्रुवारी रोजी घरमालक आणि महिलेविरुद्ध कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये) आणि आयपीसीच्या ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला विवस्त्र :मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथील रमन एसआरएच्या निवासी संकुलात सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी घरमालक आणि संबंधित महिलेविरुद्ध वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात संबंधित महिला इमारतीच्या आवारात कपडे न घालता विवस्त्र फिरताना आढळून आली होती.
गुन्हा दाखल :सांताक्रूझ येथील एसआरए इमारतीच्या पाचव्या मजल्यावर संबधित महिला घरमालकासोबत येत असत. घरमालक आपल्या कुटुंबासह बाजूच्या इमारतीत राहतात. मात्र, आरोपीचे एक घर रमण या एसआरए सोसायटीत आहे. त्यामुळे ही महिला एसआरए सोसायटीत या घरमालकाकडे येत होती. महिलेला नागरिकांनी नग्न अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.