महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांजूरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक; तरुणी जखमी

मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीमध्ये एक तरुणी जखमी झाली आहे. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे दृष्य

By

Published : Jul 3, 2019, 6:39 PM IST

मुंबई- अज्ञातांनी पुन्हा एकदा लोकलवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञातांनी बुधवारी सकाळी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाली असून तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे दृष्य


लोकलवर बाटल्या फेकण्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा एकदा ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या एका लोकलवर अज्ञातांनी दगडफेक केल्यची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये लोकल ट्रेनमध्ये उभ्या असणाऱ्या समीक्षा चाळके या तरुणीला दगड लागला आहे. दगड लागल्याने ती जखमी झाली आहे. या घटनेनंतर समीक्षाला घाटकोपर स्थानकातून जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने रविवार प्रमाणे वेळापत्रक करण्यात आले होते. सर्वच स्थानकावर प्रवाशी गर्दी होत असल्याने लोकल रोजच्या वेळेनुसार दुपारी सुरू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details