मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. सरकार ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक सिमरन यांनी नाकाबंदी दरम्यान मुंबई पोलिसांना लागणाऱ्या बॅरिकेड्सची भेट दिली आहे.
100 बॅरिकेड्स भेट -
गेल्या वर्षभरापासून मुंबई शहरात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना मुंबई पोलिसांनी कलम 144 व 188 च्या अंतर्गत 30 हजारांहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना मुंबई पोलिसांच्या खात्यातील 115हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशातच रस्त्यावर 24तास पहारा देणाऱ्या मुंबई पोलिसांसाठी सरकार ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक सिमरन यांनी तब्बल 100 बॅरिकेड्स दिले आहेत. या बॅरिकेड्सच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने पोलिसांना नाकाबंदी करणे शक्य झाले आहे.