मुंबई- मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर काळजाचा थरकाप उडविणारी घटना पाहायला मिळाली आहे. येथे रेल्वे रुळ ओलांडत असताना एक महिला लोकल खाली आली. मात्र, ती या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली आहे.
व्हिडिओ : लोकल खाली येऊनही महिला बचावली, घटना सीसीटीव्हीत कैद - local accident
रेल्वे रुळ ओलांडत असताना एक महिला लोकल खाली आली. मात्र, ती या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावली.
मोटरमनच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण थोडक्यात वाचले. ८ फेब्रुवारी रोजी दादर स्थानकावरील फलाट क्रमांक ६ वर रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दादर स्थानकावर कसारा लोकल येत असताना एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. मात्र, मोटरमनने तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावल्याने तीचे प्राण वाचले.
लोकल खाली येऊन अपघात घडण्याच्या घटना मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्यास मनाई असली तरी अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी किंवा घाईमध्ये रेल्वे ट्रक ओलांडतात. यावर नागरिकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.