मुंबई -मालाड मालवणी म्हाडा कॉलनी येथे गॅस सिलिंडर फुटल्याने भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा - भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल

गॅस सिलिंडर फुटल्याने बाजूच्या चाळींमधील भिंत कोसळून मंजू आनंद 35 वर्ष या महिलेचा मृत्यू झाला. तर शितल काळे (44 ), सिद्धेश गोटे (19) हे जखमी झाले असून ममता पवार (22) 80 टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर अश्विनी जाधव (26) या 15 टक्के भाजल्या आहेत. या सर्वांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.
हेही वाचा - अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; प्रवेश मुदतवाढ देऊनही जागा रिकाम्याच