मुंबई- सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई पोलीस खात्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या भोईवाडा पोलीस ठाण्यांमध्ये एका पोलीस हवालदाराने एका महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पीडित महिला पोलीस शिपायाकडून भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून करत होता बलात्कार
2015 पासून लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिला पोलीस शिपायावर पोलीस हवालदार हा सतत बलात्कार करत आलेला होता. एवढेच नाही तर मद्यधुंद अवस्थेत बऱ्याच वेळा त्याने या महिला पोलीस शिपायाला मारहाण सुद्धा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिला पोलीस शिपाई ही आरोपी पोलीस हवालदाराला लग्नासाठी विचारणा करू लागली असता, या पोलीस हवालदाराने या महिला शिपायास मारहाण करत होता. यावर संशय आल्यामुळे या महिला पोलीस शिपायाने त्या पोलीस हवालदाराबद्दल अधिकची चौकशी केली.
लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस शिपायावर हवालदाराचा वारंवार बलात्कार - mumbai police
2015 पासून लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिला पोलीस शिपायावर पोलीस हवालदार हा सतत बलात्कार करत आलेला होता. गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिला पोलीस शिपाई ही आरोपी पोलीस हवालदाराला लग्नासाठी विचारणा करू लागली असता, या पोलीस हवालदाराने या महिला शिपायास मारहाण करत होता.

आरोपी विवाहित-
आरोपी पोलीस हवालदाराचे या अगोदरच लग्न झाले असून त्याला मुलसुद्धा असल्याची धक्कादायक माहिती त्या पोलीस महिलेस चौकशीतून मिळाली. या नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरच्या महिला पोलीस शिपायाने भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारदार महिला पोलीस शिपाई व बलात्काराचा आरोप करण्यात आलेला पोलीस हवलदार हे दोघेही मुंबई पोलीस खात्यामध्ये सध्या कार्यरत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.