मुंबई : आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी केलेल्या ऐश्वर्यासंदर्भातील वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. विजयकुमार गावित यांनी मासे खाल्ले तर तुमचे डोळे हे अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रमाणे होतील. ती मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत असे भर कार्यक्रमात वक्तव्य केले होते. इतरही काही गोष्टी ते बोलले. राज्य महिला आयोगाकडून गावित यांच्या त्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी गावित यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसीवर तीन दिवसात खुलासा मागितला आहे.
रुपाली चाकणकर यांनी पाठवली नोटीस: आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गवितांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नोटीस बजावली आहे. लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यामुळे महिलांचा अपमान होतो. तर लोकप्रतिनिधींना कुठलेही उदाहरण देण्यासाठी महिलांची गरज का भासते? असा सवाल केला आहे. तर महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असा इशारा, चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान यासंदर्भात विजयकुमार गावित यांनी तीन दिवसात खुलासा द्यावा असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.