महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करत वटपौर्णिमा साजरी - vatpaurnima festival

मुंबईत मास्क आणि सोशल डिस्टंसचे पालन करत वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

Vatpaurnima celebration Mumbai
मुंबईत मास्क आणि सोशल डिस्टंसचे पालन करत वटपौर्णिमा साजरी

By

Published : Jun 5, 2020, 6:24 PM IST

मुंबई- लॉकडाऊन घोषित केल्यापासून मुंबईतील नागरिकांना एकही सण रस्त्यावर उतरून साजरा करता आला नव्हता. दरम्यान एक जूनपासून अनलॉक- १ घोषित करण्यात आला असून अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत सोशल डिस्टंस ठेवून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. सौभाग्याचे प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार वटवृक्षाका अर्पण करून पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. दरवर्षीप्रमाणे यावेळीची वटपौर्णिमा वेगळी होती. यावर्षी महिलांनी मास्क घालून वटवृक्षाला फेरी मारली होती. काही महिलांनी घरातच वटपौर्णिमा साजरी केली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावेळी गर्दी कमी होती.

१ जूनपासून काही काही प्रमाणात नियम शिथिल केल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची संधी मिळाली. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही सोशल डिस्टंसचे पालन करत मास्क घालून वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या, असे ज्योती वाघ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details