मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज पी-३०५ वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही कर्मचाऱ्यांशी अजूनही संपर्क होऊ शकला नाही आहे. बार्जवरील राध्येशाम ठाकूर या कर्मचाऱ्याच्या पत्नीने माझ्या पतीला शोधा अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. तसेच आणखी एका व्यक्तीने आपल्या भावाशी संपर्क होत नसल्याचे म्हटले आहे.
बार्ज पी ३०५-वर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा आपल्या आप्तांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नातेवाईकांबाबत माहिती कळवावी अशी विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, की अॅफकॉन आणि ओएनजीसीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही कोणतीही माहिती मिळू शकली नाही.