महाराष्ट्र

maharashtra

घाटकोपरमध्ये खळबळ! सासू आणि पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने केली आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 10:53 PM IST

Woman Suicide Case: घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमानी कुर्ला परिसरात एका 25 वर्षीय महिलेने पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. (interrogation of husband) याप्रकरणी मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा काल रात्री उशिरा पावणे बारा वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आला असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली आहे.

Woman Suicide Case
महिलेने केली आत्महत्या

मुंबईWoman Suicide Case:मृत महिलेचे नाव लक्ष्मी उर्फ मानसी उचकिल्ला असं आहे. मानसी हिने नऊ तारखेला रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एका ओळखीच्या व्यक्तीने मानसीची आई आजम्मा बोडी आणि वडिलांना फोन करून राहत्या घरात मानसीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. (beating of wife) मानसीची आई आजम्मा तायप्पा बोडी (वय 46 वर्षे) ह्या आपल्या कुटुंबासह तेलंगणा राज्यातील नारायण पेठ जिल्ह्यात राहतात. आपल्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती कळताच त्यांनी लागलीच ठाण्यात राहणारा आपल्या भावाला याबाबत माहिती दिली आणि घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात पाठवले.


हुंड्यासाठी मानसीला मारहाण:मानसीच्या आईने पोलिसांना माहिती दिली आहे की, मानसीचे लग्न 12 मे 2022 ला सतीश उचकील्ला याच्यासोबत झाले. त्यानंतर ती त्याच्यासोबत कुर्ला कमानी येथील बाल गोपाळ मित्र मंडळ येथे राहत होती. मात्र लग्नात हुंडा दिला नाही या कारणामुळे पती सतीश आणि सासू अंजम्मा मानसीला शिवीगाळ करून मारहाण करत होते. या त्रासाबाबत मानसीने आपल्या आईला माहिती दिली होती. मात्र मुलीचा संसार मोडू नये थोडे नवरा-बायको मध्ये वाद होतात, अशी समजूत घातली. मात्र लग्नानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तिचे सासरची मंडळी घरातील खर्चासाठी मानसीकडे पैशांची मागणी करून तिला मानसिक त्रास देत असत. त्यावेळी मानसीच्या आई वडिलांनी 1 लाख रुपय रोख रक्कम सासरच्या लोकांना दिली. ते पैसे परत करण्यासाठी देखील मानसीच्या लग्नात घातलेले दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र मोडले एक लाख रुपये परत केले होते.

यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न:दरम्यानच्या काळात भर पावसाळ्यात सासूने मानसीला घराबाहेर राहावयास सांगितले. त्यावेळी देखील भाड्याच्या घरात राहण्यासाठी मानसीच्या वडिलांनी 25000 डिपॉझिट रक्कम आणि घर खर्चासाठी 15000 रुपये मानसीच्या नवऱ्याला दिले. आजतागायत मानसीच्या आई-वडिलांनी जावई असलेल्या सतीश याला पाच लाख रुपये दिले आहेत. मानसी फोनवर बोलत असताना सतीश वारंवार तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. याच रागाने मानसीने 26 जुलै 2023 ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्रासाची आईला दिली होती कल्पना:25 डिसेंबर 2023 ला तेलंगणा येथे गावच्या यात्रेसाठी मानसी आणि सतीश आले असल्याची माहिती देखील मानसीच्या आईने पोलिसांना दिली. त्यावेळी देखील मानसीने वारंवार तिचा नवरा सतीश शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण करत असल्याबाबत तक्रार आईकडे केली होती. नंतर सतीश याला मानसीच्या आई-वडिलांनी समजावले. मला पुन्हा त्रास दिल्यास मी आत्महत्या करेल असे मानसी त्यावेळी बोलली होती. एक जानेवारीला गावावरून मुंबईत सतीश आणि मानसी आले. 7 जानेवारीला मानसी हिने आईला फोन केला आणि हळू आवाजात आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. मात्र शेवटी पती सतीश आणि सासू अंजम्मा या दोघांनी वारंवार हुंड्याची मागणी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याने मानसी हिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे.

हेही वाचा:

  1. देशातील सर्वात मोठ्या 'अटल सेतू सागरी' प्रकल्पाचं होणार लोकार्पण; का आहे खास? जाणून घ्या सविस्तर
  2. कुठल्याही विषयाचं घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतोच; जरांगेंच्या आंदोलनावरून उदयनराजेंची प्रतिक्रिया
  3. विलेपार्ले येथे कारचालकावर जीवघेणा हल्ला, जुहू पोलिसांनी सहा जणांना केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details