महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Worli Sea Face Accident : मॉर्निंग वॉक करणाऱ्या कंपनीच्या सीईओ महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू, चालकाला अटक - सुमेर मर्चंट

वरळी सी फेस येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका 23 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी वरळी सी फेसवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका महिलेला कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर 23 वर्षीय चालकाला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या अपघातात कारचालकही जखमी झाला आहे.

Worli Sea Face Accident
Worli Sea Face Accident

By

Published : Mar 19, 2023, 10:10 PM IST

मुंबई :वरळी डेअरीजवळ जॉगिंग करत असताना रविवारी सकाळी एका 42 वर्षीय महिलेला कारने जोरदार धडक दिली. वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. वरळी पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय दंड संविधानाच्या विविध कलमानांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजलक्ष्मी राज कृष्णन असे, मृत महिलेचे नाव आहे. अटक आरोपीचे नाव सुमेर मर्चंट असे असून तो ताडदेव येथील रहिवासी आहे.

कालचालकाला अटक :वरळी सी फेस येथे असलेल्या वरळी डेअरी परिसरात 42 वर्षीय महिला जॉगिंग करत असताना एका वेगवान कारने तिला मागून धडक दिली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेत कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर जाऊन आदळली. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर कारचालकाला अटक करण्यात आली.

आरोपी अटकेत - वरळी पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी सुमेर मर्चंट (वय २३) याला अटक केली आहे. आरोपी चालकाला पोलीस उद्या न्यायालयात हजर करणार आहेत. राजलक्ष्मी कृष्णन असे या महिलेचे नाव असून ती मुंबईतील दादर माटुंगा येथील रहिवासी आहे. ती एका कंपनीची सीईओ होती.

डोक्याला जबर मार :राजलक्ष्मी राज कृष्णन ही 42 वर्षीय महिला वरळी डेअरीजवळ जॉगिंग करत होती. ही घटना पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. महिलेला तात्काळ जवळी पोद्दार रुग्णालयात नेण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. महिलेला या अपघातात डोक्याला जबर मार बसल्याची माहिती मिळत आहे. वरळीतील उच्चभ्रू परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. कार चालक भरधाव वेगाने कार चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे जोरदार धडक बसल्याने महिलेच्या जागीच मृत्यू झाला. कारचालक 23 वर्षाचा असून तो टाटा नेक्सन इव्ही कार चालवत होता.

राजलक्ष्मी टेक्नॉलॉजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी : वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजलक्ष्मी रामकृष्णन ही महिला दादर माटुंगा परिसरातील राहणारी आहे. ती शिवाजी पार्क तसेच अन्य जॉगर्स ग्रुपशी जोडलेली आहे. हे जॉगर्स ग्रुप नियमितपणे दर रविवारी जॉगिंग करतात. राजलक्ष्मी यांच्या पती देखील धावपट्टू असून त्यांना कॉल आल्यानंतर ते शिवाजी पार्क येथे पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे मित्रपरिवार देखील त्यांच्यासोबत होता. राजलक्ष्मी ह्या टेक्नॉलॉजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रीती सोमपुरा या ज्येष्ठ पत्रकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी कार चालकाला पकडले. आरोपी सुमेर मर्चंट हा त्याच्या मैत्रिणीला सोडण्यासाठी शिवाजी पार्क येथे जात असताना हा अपघात झाला.

हेही वाचा - Bageshwar Dham in Mumbai: दरबारात प्रश्न सुटलाच नाही, उलट मंगळसुत्राची झाली चोरी! हवालदिल महिला म्हणाली...

ABOUT THE AUTHOR

...view details