मुंबई- पुण्याच्या एका वकील महिलेने आज ( दि. 29 ) मंत्रालयाच्या दारातच आत्महत्या ( Woman Try to Suicide In Mumbai ) करण्याचा प्रयत्न केला. दौंडचे (जि. पुणे) पोलीस उपाधीक्षकांवर या महिलेने आरोप केले आहे. उपाधीक्षकांनी छेडछाड केली व तिच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप त्या महिलेने केले आहेत. सतत गृह विभागाकडे तक्रार केल्यानंतरही न्याय भेटत नसल्याने तीने हे टोकाचे पाऊस उचलले, असे सांगण्यात येत आहे.
Woman try Suicide : मंत्रालयासमोरच वकील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न - वकील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुण्याच्या एका वकील महिलेने आज ( दि. 29 ) मंत्रालयाच्या दारातच आत्महत्या ( Woman Try to Suicide In Mumbai ) करण्याचा प्रयत्न केला. दौंडचे (जि. पुणे) पोलीस उपाधीक्षकांवर या महिलेने आरोप केले आहे. उपाधीक्षकांनी छेडछाड केली व तिच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप त्या महिलेने केले आहेत.
![Woman try Suicide : मंत्रालयासमोरच वकील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न मंत्रालय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13768264-627-13768264-1638184483172.jpg)
आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे सर्वच नेते, मंत्री मंत्रालयात उपस्थित होते. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण मंत्रालयात पसरली. या गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. गृह विभागातूनही या प्रकरणाची पूर्ण चौकशी लवकरात लवकर करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील गोष्टीचा तपास केला जाणार आहे.
हे ही वाचा -IT Raid : पुण्यात प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा