मुंबईWoman Murder Case:महिलेच्या हत्येप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (gold ornaments on burnt body) मात्र, या मृतदेहावर पोलिसांना आढळून आलेल्या दागिन्यांवरून चार दिवसांनी वडाळा पोलिसांनी एका मुल्ला नावाच्या कुटुंबीयांचा माग काढला आहे. वडाळ्यातील संगम नगर परिसरात राहणाऱ्या मुल्ला कुटुंबीयांनी देखील सोन्याच्या दागिन्यांवरून मृत ७१ वर्षीय महिला आपली आई असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र, 'डीएनए' जुळल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात देणार नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. (identification of dead woman)
'तो' मृतदेह घरकाम करणाऱ्या महिलेचा?वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आम्हाला वडाळा बीपीटी ट्रॅक परिसरात एक जळालेल्या अवस्थेत आणि तीन तुकड्यांमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अस्पष्ट दिसत असलेल्या चेहऱ्यावरून वडाळा परिसरात पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना संगम नगर परिसरातील एक वयस्कर महिला घरकाम करणारी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडाळा पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेची माहिती काढून तिच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी मुलाने मृतदेहावरील दागिने आईचे असल्याचे सांगितले. तसेच ती काही दिवसांपासून नवी मुंबईत मामाकडे राहायला गेली होती. ती बऱ्याच वेळा घरी येत नाही. त्यामुळे आम्ही तिची मिसिंग तक्रार दिली नसल्याची माहिती मुल्ला कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.