मुंबई -मुंबईतील एका युवतीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्कारचा आरोप केला आहे. तसेच तिला मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तिने म्हटले आहे. यासंदर्भात युवतीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे.
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची केली मागणी -
बॉलीवुडमध्ये काम करणाऱ्या एका युवतीने हेमंत सोरेन यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हेमंत सोरेन यांनी 5 सप्टेंबर 2013 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, असेही तीने म्हटले आहे. यासंदर्भात तिने वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली असून महाराष्ट्र सरकारने याची सीबीआई चौकशीही करावी, अशी मागणी तिने केली. दरम्यान, तीची एक चिठ्ठी सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिने हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच याची निष्पक्ष चौकशी न केल्यास देशातील महिलांवरील अत्याचार थांबणार नाही, असेही तिने या चिठ्ठीत म्हटले आहे.