महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - jitendra awhad Molestation Case

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (Molestation Case On Jitendra Awhad). मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

By

Published : Nov 14, 2022, 5:27 PM IST

Updated : Nov 14, 2022, 7:06 PM IST

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (jitendra awhad Molestation Case). राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय सूड भावनेने कारवाई केलेली नाही, हे कायद्याचे राज्य. गुन्ह्यांचा पारदर्शक तपास होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिली आहे. परळ येथील शिरोडकर हायस्कूल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे

राजकरणा पेक्षा समाजकारण आवडते - परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाल दिनानिमित्त हजेरी लावली होती. आज मुख्यमंत्री नव्हे तर एक विद्यार्थी म्हणून मी शाळेत आल्याचे ते म्हणाले. बाल दिन आज वेगळा अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या अवघड प्रश्नांची उत्तर दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राजकरणा पेक्षा मला समाजकारण आवडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिन्हाचे प्रकरणावर बोलणे टाळले - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्ली उच्च न्यायालयात शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी हा पक्ष चालवत आहे. निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसत आहे त्या आधारे निकाल दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही. मी आज माझ्या वडिलांनी दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी खंत व्यक्त करणारा युक्तिवाद न्यायालयात केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ठीत असल्याने त्यावर बोलणं योग्य नसल्याचे सांगितले.

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा :राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदारजितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (Molestation Case On Jitendra Awhad). मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड याने आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

'हर हर महादेव' चित्रपटावरून वाद: 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा दावा करीत त्या आधारे या चित्रपटाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो देखील बंद पाडला होता. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या गेला आहे.

Last Updated : Nov 14, 2022, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details