मुंबई - जुहू समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना नेणाऱ्या बोटीतून एक ४२ वर्षीय महिला तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना शुक्रवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली. तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तिला तातडीने बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले.
जुहू समुद्रकिनारी बोटीतून महिला खाली पडली - woman
नीता भानुशाली असे सदर महिलेचे नाव आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
नीता भानुशाली असे सदर महिलेचे नाव आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे जुहू समुद्रकिनारी पर्यटकांसाठी फेरी बोट सुरू करण्यात आली आहे. ही घटना घडली, त्यावेळी बोटीत 12 प्रवासी होते. वेळीच महिलेला रुग्णालयात दाखल केल्यामुळे आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ती सुखरूप असल्याचे जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी सांगितले.