महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईमध्ये खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी - मुंबईमध्ये अपघात

मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्ग हा नवी-मुंबईतील ऐरोलीला जोडणारा लिंक रोड सध्या मृत्यूचा सापळा बनतोय. या रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.

मुंबईमध्ये खड्यांनी घेतला महिलेचा बळी

By

Published : Oct 15, 2019, 4:14 PM IST

मुंबई- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला, तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुंबईत पुन्हा एकदा एका महिलेने आपला जीव गमवला. टिळकनगर येथील शीला कदम या महिलेचा मुलुंडच्या हद्दीत दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

यतीन कदम, मृत महिलेचा मृत्यू

हेही वाचा - 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'

यावर अपघातात आई गेल्याचे दुःख आहे. पण सरकारकडून ही अपेक्षा नव्हती, अशी भावना शीला कदम यांचा मुलगा यतीन कदम यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक संदर्भात रविंद्र वायकर यांची उच्च न्यायालयात रिट याचिका

मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्ग हा नवी-मुंबईतील ऐरोलीला जोडणारा लिंक रोड सध्या मृत्यूचा सापळा बनतोय. या रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. 27 सप्टेंबरला 63 वर्षांच्या शीला कदम या ऐरोलीला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आपल्या मुलासोबत दुचाकीने टिळकनगर कुर्ला येथून निघाल्या होत्या. पूर्व द्रुतगती मार्गावरून एरोली टोल नाका पार केल्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मुलगा यतीन याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी शीला कदम याचा तोल जाऊन जमिनीवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना ऐरोलीच्या क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details