महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझा भाऊच पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असे वाटले, उद्धव ठाकरेंबद्दल भगिनीचे गौरवोद्गार - corona in maharashta

मुलुंडच्या रहिवाशी असणाऱ्या एलिझाबेथ पिंगळे या इस्त्राईलला गेल्या होत्या. तेथून दिल्लीला परतल्यावर लॉकडाऊनमुळे त्या अडकून राहिल्या. अशातच ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 6, 2020, 8:40 AM IST

मुंबई- संकटात महाराष्ट्रातील भगिनीच्या मागे भावाने खंबीरपणे कसे उभे राहावे, याचा आदर्शच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतरांसमोर घालून दिला आहे. मुलुंडच्या रहिवाशी असणाऱ्या एलिझाबेथ पिंगळे या इस्त्राईलला गेल्या होत्या. तेथून दिल्लीला परतल्यावर लॉकडाऊनमुळे त्या अडकून राहिल्या. अशातच ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला माझा भाऊच पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले, असे गौरवोद्गार एलिझाबेथ पिंगळे यांनी काढले आहेत.

मी आताच महाराष्ट्र सदनमध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटत आहे. माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटत आहे, असे एलिझाबेथ पिंगळे आनंदाने सांगत होत्या. एलिझाबेथ पिंगळे मुलूंडच्या रहिवाशी आहेत. आजारी वडिलांना भेटायला त्या इस्त्राईलला गेल्या आणि दुर्देवाने वडिलांचे निधन झाले. यामुळे, त्यांचे तेथील वास्तव्य लांबले. त्या २२ मार्च ला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते. परंतु, त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये केली. ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले.

एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण येथे अडकले असून या सर्वांना मदत करावी, असा संदेश देणारा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला. यानंतर त्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन येथे करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आणि आरोग्य विभागाच्या मान्यतेनंतर आज त्या महाराष्ट्र सदन येथे सुखरूप पोहोचल्या.

तुम्ही एकट्या नाहीत, घाबरून जाऊ नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. हे सांगणारा आश्वासक संवाद आणि पुढे केलेला मदतीचा हात पाहून मी खूप भारावून गेले आहे. आपल्याच माणसांनी इतकी आस्थेवाईकपणे चौकशी केली, माझी व्यवस्था केली. मी त्या सगळ्यांची विशेषत: मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र सदनातील आणि इतर अधिकारी या सगळ्यांची खूप आभारी आहे, असे एलिझाबेथ पिंगळे यांनी म्हटले. v

ABOUT THE AUTHOR

...view details