महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, प्रवीण दरेकर यांची मागणी - Praveen Darekar protest Malvani Police Thane

मालवणी परिसरात 15 जानेवारी रोजी राममंदिर निधी संकलनाचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, कोणीतरी ते फाडले. त्यावर आम्ही पोलिसांना सहकार्य केले. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई केली. पोलिसांनी तत्काळ भाजप कार्यकर्त्यांवर जी गुन्हे दाखल केले आहेत, ते परत घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

Banner Case Praveen Darekar Reaction
बॅनर प्रकरण प्रवीण दरेकर प्रतिक्रिया

By

Published : Jan 23, 2021, 3:29 PM IST

मुंबई - मालवणी परिसरात 15 जानेवारी रोजी राममंदिर निधी संकलनाचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, कोणीतरी ते फाडले. त्यावर आम्ही पोलिसांना सहकार्य केले. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई केली. पोलिसांनी तत्काळ भाजप कार्यकर्त्यांवर जी गुन्हे दाखल केले आहेत, ते परत घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. या मागणीसाठी दरेकर यांच्या नेतृत्वात भाजप तर्फे आज मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करण्यात आले.

माहिती देताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

हेही वाचा -'कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारची परवानगी घ्या'

आंदोलनात खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर उपस्थित होते. पोलीस स्टेशन बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्री. रामची घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची पोलिसांना मागणी केली. जर असे केले नाही तर भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती दरेकर यांनी दिली.

हेही वाचा -मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी शरद पवार राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details