मुंबई:मुंबईत सोमवारी ६७६ नवे रुग्ण नोदवल्या गेले ( Mumbai Corona Update ) आहेत. ३१८ रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७९ हजार ५३४ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४५ हजार ७२७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२३८
सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०५१ दिवस इतका आहे.
मुंबईत गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६६ टक्के इतका आहे. मुंबईत आज सापडलेल्या ६७६ रुग्णांपैकी ६२२ म्हणजेच ९२ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ६०१ बेड्स असून त्यापैकी २१९ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.