मुंबई :मुंबईमध्ये राज्यभरात सहित देशभरातून सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. मुंबईमध्ये नामांकित टाटा कॅन्सर हॉस्पिटल, केईएम रुग्णालय तसेच बालकांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेला वाडीया हॉस्पिटल हे परेल परिसरामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे येत असतात. रुग्णांवर उपचाराचा कालावधी हा कधी कधी अनेक महिनेही (Free Food Patients Mumbai) चालतो. अशा वेळेस रुग्णालयात उपचार तर मिळतात. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची आणि खाण्याच्या सोयीचे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात (Two time free Food). पैसे अभावी अनेकवेळा रुग्णांचे नातेवाईक हे रुग्णालय परिसर किंवा रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या फुटपाथ वर रात्र काढतात. मात्र रुग्णालय परिसरात झोपून रात्र काढली तरी, खाण्यासाठी पैसे कुठून आणायचे, ही समस्या नातेवाईकांसोबत नेहमीच असते. रुग्णाच्या उपचारासहितच या सर्व समस्यांना नातेवाईकांना तोंड द्यावे (Free Food Mumbai) लागते.
विथ आर्या संस्था' देतेय ‘दोन घास’ अनेक समस्या निर्माण:नातेवाईकांची ही समस्या पाहून शितल भाटकर या महिलेने नातेवाईक तसेच रुग्णांना दोन वेळचे जेवण मिळावं. यासाठी पुढाकार घेतला आहे. शितल भाटकर 'विथ आर्या' ही संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या बाहेर ते रोज जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नाचे वाटप करतात. रोज या नातेवाईकांना अन्नाचे पाकीट आणि यासोबतच मिठाई आणि फळ आणि एक पाण्याची बाटली मोफत दिली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी फुटपाथवर सर्व नातेवाईकांना जेवणाच्या पाकिटाचे वाटप केलं जातं.
मोफत अन्न वाटप: राज्यभरातून आलेल्या गरीब रुग्ण आणि नातेवाईकांना त्याचा मोठा आधार मिळत आहे. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत होत असले, तरी औषधांना बरेच वेळा पैसे जात असतात. अनेकवेळा उपचारही अनेक महिने चालतो. अशा परिस्थितीत अन्न विकत घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे बरेच वेळा पैसे राहत नाही. अशा परिस्थितीत विथ आर्या या संस्थेच्या माध्यमातून शितल भाटकर यांच्याकडून मोफत अन्न वाटप केले जात असल्याने त्याचा मोठा आधार या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत आहे. त्यामुळेच रोज हे अन्न घेण्यासाठी या परिसरात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून गर्दी वाढतच जाताना पाहायला मिळते.
विथ आर्या संस्थेची अशी झाली सुरुवात:२०१० साली शितल भाटकर यांच्या लहान मुलगा आर्या याला अत्यंत दुर्मिळ असा आजार झाला होता. आर्यावर उपचारासाठी शितल भाटकर यांनी रुग्णालयात जात होते. मात्र रुग्णालयात जात असताना तिथे आजूबाजूला असलेल्या नातेवाईकांची होणारी फरपट शितल भाटकर यांच्या लक्षात आली. मात्र त्यावेळी त्या स्वतः आपल्या मुलाच्या उपचारात व्यस्त होते. दुर्दैवाने शितल यांचा मुलगा आर्या हा त्या आजारातून वाचू शकला नाही. मात्र या दुःखातून यांनी स्वतःला सावरत रुग्णालय परिसरात रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी फरपट कमी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना त्यांचे पती विक्रांत भाटकर यांनीही साथ दिली. २०१५ पासून त्यांनी दवाखान्याच्या शेजारी फुटपाथ वर रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत अन्न देण्याची सर्वात केली. सुरवातीला स्वतःच्या खर्चाने त्यांनी रोज ५० रुग्णाच्या नातेवाईकांना अन्न द्यायला सर्वात केली. सुरवातीला स्वतः बनऊन ते रोज अन्न वाटप करत होत्या.
३५० रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्न:मात्र केवळ ५० जणांचे रोजचे जेवण कमी पडत होते. अन्न मागणारे हात खूप होते. पण अन्न मोफत देण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्याला अन्नाची व्यवस्था करायला लागेल याची कल्पना भाटकर दाम्पत्यांना आली होती. आणि त्यांनी 'विथ आर्या' या संस्थेच्या कशा वाढवण्याचा निश्चय केला आहे. मिळेल तिथून मदत आणायला, त्यांनी सुर्वात केली. तसेच आपल्या सोबत अजून सहकारी लागतील, याचीही कल्पना भाटकर दाम्पत्यांना आली. आता त्याच्या सोबत फोरम लापसिवला केतकी महिमकर, राज जैन, संकेत तारी, केदार लेले अशी 7 ते 8 जणांची टीम त्यांनी तयार केली आहे. तसेच काही सस्थाच्या मदतीने रोज सकाळी आणि संध्याकाळी ते जवळपास ३५० रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्न देत आहे. अडचणीत आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण मिळत असल्याने त्याचा मोठा फायदा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.
4 शहरात मोफत दिले जाते जेवण: परेल परिसरातील रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय होत असली. तरी हा प्रश्न केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही. याची जाणीव शितल भाटकर यांना झाली होती. म्हणूनच त्यांनी मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर या शहरात सरकारी रुग्णालयाच्या बाहेर देखील त्याच्या संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्न द्यायला सूर्वात त्यांनी केली आहे. लवकरच पुणे आणि नाशिक शहरात देखील ही सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.