महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन 2019: राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्वपूर्ण घोषणा - सरकारने केल्या 'या' महत्वपूर्ण घोषणा

नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता काल (२१ डिसेंबर) झाली. नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन होते. या अधिवेशनात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या आहेत.

winter session 2019
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्वपूर्ण घोषणा

By

Published : Dec 22, 2019, 4:42 PM IST

मुंबई - नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता काल (२१ डिसेंबर) झाली. नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन होते. या अधिवेशनात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या आहेत. यातील महत्वाचा निर्णय म्हणजे २ लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. याबरोबरच पाहुयात आणखी काही महत्वाचे निर्णय....



अधिवेशनात झालेले महत्वाचे निर्णय

१) महात्मा फुळ कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत २ लाखांची कर्जमाफी

२) १० रुपयामध्ये जेवण (शिवभोजन योजना) ५० ठिकाणी केंद्र सुरु करणार

३) प्रत्येक जिल्ह्यात CMO कार्यालय सुरु करणार, ते मंत्रालयाच्या कार्यालयाशी कनेक्ट

४) समृद्धी महामार्ग लवकर पूर्ण करणार

५) पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा

६) सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती नाहीट

७) विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पाची कामे सुरु

८) यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी २५३ कोटी रुपये देणार

९) कृषी समृद्धी केंद्रामध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करणार

१०) ५ लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती करणार

११) धान उत्पादक शेतकऱ्यासाठी अधिकचे २०० रुपये देणार

१२) आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद

१३) अन्न प्रकिया उद्योगाची उभारणी करणार

१४) विदर्भात पर्यटनाच्या सोयी सुविधा उभारणार

१५) विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

ABOUT THE AUTHOR

...view details