मुंबई :राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली फौजदारी (Governor Bhagat Singh Koshyari) जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठाने स्वीकारली आहे. आज याचिकाकर्ते यांचे वकील नितीन सातपुते यांनी खंडपीठांसमोर मेन्शनिंग केल्यानंतर याचिका स्वीकारण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी लवकरच घेण्याचे खंडपीठाने याचिकाकर्ते यांना आश्वासन दिले आहे.
राज्यपालांवर महाभियोग येणार का ?आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांना विचारलं की, राज्यपाल यांना घटनात्मक संरक्षण आहे. ही याचिका का मान्य करावी ? त्यावर वकील नितीन सातपुते यांनी असे म्हटले की राज्यपाल या पदाला घटनात्मक संरक्षण असलं तरी ते वैयक्तिक आक्षेपार्ह टिप्पणी करत असेल तर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जाऊ शकतो असे सांगितल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती यांनी म्हटले की ही याचिका या मागणीवर आधारीत आहे का ? यावर वकील नितीन सातपुते यांनी म्हटले की याचिकेतील प्रमुख मागणी हीच आहे. त्यानंतर मुख्य मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी लवकरच घेण्याचे निश्चित करण्यात येईल असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी म्हटले आहे.