मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधिमंडळातील विरोधी पक्षनेता कोण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Split in NCP) वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील तात्कालीन महाविकास आघाडी सरकार पडले होते. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे संख्याबळानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद (Assembly Opposition Leader) राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद ठाकरे गटाकडे होते. आता राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर गणित बदललेली आहे. 45 आमदार असलेला काँग्रेस पक्ष विधानसभेतील मोठा पक्ष झाला आहे.
संख्या जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता :कालची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही देशांमध्ये सत्ताधारी जशी मान्य केले तसे विरोधी देखील मान्य केला आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी कालची घटना आहे. मात्र सर्व जनता बघत आहे. आताच्या घडीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सर्वांत जास्त आमदार असलेला पक्ष कॉंग्रेस आहे. गटनेता करण्याचा अधिकार त्यांना आहे. विरोधी पक्षानेतेबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत उद्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा देखील होणार आहे. आमची महाविकास आघाडी भक्कम असल्याचा देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.