महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एस.टी कर्मचारी वेतन : शरद पवारांकडून परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन - Sharad Pawar Assurance to ST Association

एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यातील शेकडो एस.टी कर्मचाऱ्यांचे कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत थकीत वेतनामुळे आर्थिक संकट कोसळले असल्याचे सांगत थकीत वेतनाबाबत चर्चा केली. तसेच, या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली. त्यावर पवार यांनी आपण तातडीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Oct 27, 2020, 3:50 PM IST

मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी त्यांना थकित वेतन मिळावे, यादृष्टीने परिवहन मंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटना प्रतिनिधींना दिले. पवार यांच्या या आश्वासनामुळे राज्यातील शेकडो एस.टी कर्मचाऱ्यांना आपले मागील काही महिन्यात थकलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यातील शेकडो एस.टी कर्मचाऱ्यांवर कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत थकित वेतनामुळे आर्थिक संकट कोसळले असल्याचे सांगत वेतनाबाबत चर्चा केली. तसेच, या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली. त्यावर पवार यांनी आपण तातडीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

हेही वाचा-यूट्यूब व्हिडिओ पाहून एटीएम कापण्याचा प्रयत्न; आरोपीला रंगेहात पकडले

ABOUT THE AUTHOR

...view details