महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवसेनेसोबत बैठकीला बसल्यावर दहा मिनिटात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवू' - Sudhir Mungantiwar Legislative Assembly Meeting News Mumbai

शिवसेनेसोबत बैठकीला बसल्यावर दहा मिनिटात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवू, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Oct 30, 2019, 6:34 PM IST

मुंबई- शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा होण्यापूर्वीच भाजपने आपला विधिमंडळ नेता अर्थात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. मात्र, शिवसेनेसोबत बैठकीला बसल्यावर दहा मिनिटात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवू, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार

या आठवड्यात सत्ता स्थापन होईल, असेही मुनगंटीवार यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत विशेष चर्चेदरम्यान सांगितले. देशभक्तीच्या मुद्यावर भाजप आणि शिवसेना एकत्र आली असून याच मुद्यावर पुन्हा एकदा शिक्केमोर्तब होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-'माझे समर्थन भाजपला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details