महाराष्ट्र

maharashtra

अनुराग प्रकरणी न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसणार- पायल घोष

अनुराग प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी पायल आज वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यावेळी, मी अनुराग विरोधात केलेली तक्रार ही मजबूत आहे. मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. परंतु, पोलिसांनी काही केले नाही तर मी पोलीस ठाण्यात उपोषणाला बसणार. असा इशारा पायलने दिला.

By

Published : Sep 27, 2020, 7:15 PM IST

Published : Sep 27, 2020, 7:15 PM IST

पायल घोष
पायल घोष

मुंबई- अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी पायलने अनुरागविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, असे करून १ आठवडा उलटला असूनही अद्याप या प्रकरणी काही कारवाई न झाल्याने पायलने वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अनुराग प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी पायल आज वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यावेळी, मी अनुराग विरोधात केलेली तक्रार ही मजबूत आहे. मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. परंतु, पोलिसांनी काही केले नाही तर मी पोलीस ठाण्यात उपोषणाला बसणार. असा इशारा पायलने दिला. तसेच, गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी ९० दिवसांचा अवधी असतो. म्हणून, स्थिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो होतो. तसेच, दररोज या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असे पायलचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.

हेही वाचा-..हे म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार - दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details