महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुन्नाभाई राजकारणात.. संजय दत्त जाणार महादेव जानकरांच्या पक्षात ? - mahadev jankar mumbai

राष्ट्रीय समाज पक्षाच्या दादर येथे घेतलेल्या महामेळ्याव्यात अभिनेता संजय दत्त हा सहभागी होणार होता. पण तो दिल्लीत असल्यामुळे तो सहभागी होऊ शकला नाही. मात्र, त्यानी व्हिडिओ पाठवत रासपला १६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, असे जानकर यांनी सांगितले.

संजय दत्त

By

Published : Aug 25, 2019, 7:26 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहे. ते लवकरच रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे रासप चे अध्यक्ष, मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले आहे. आपल्या पक्षाच्या १६ व्या वर्धापनदिनी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

रासपला १६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना बॉलिवूड अभिनेता संजय दत्त

संजय दत्त आजच प्रवेश करणार होते. मात्र ते बाहेर गावी असल्याने २५ सप्टेंबरला ते प्रवेश करणार असल्याचे जानकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या दादर येथे घेतलेल्या महामेळ्याव्यात अभिनेता संजय दत्ता हा सहभागी होणार होता. पण तो दिल्लीत असल्यामुळे तो सहभागी होऊ शकला नाही. मात्र, त्यानी व्हिडिओ पाठवत रासपला १६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्त हा येणाऱ्या विधानसभेत रासपचा प्रचार करणार आहे, असे जानकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details